Durga-Puja

मध्य प्रदेशात एका महिलेने आपली जीभ कापून देवीला दान केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. गुड्डी तोमर असं या महिलेचं नाव असून ती दुर्गा मातेची भक्त आहे. जीभ कापल्यानंतर महिला बेशुद्ध पडली होती. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
तरसमा गावात ही घटना घडली आहे. गावात बिजासेन देवीचं मंदिर आहे. याच मंदिरात गुड्डी तोमर यांनी आपली जीभ कापून देवीला अर्पण केली. महिला बेशुद्द पडल्यानंतर मंदिरात उपस्थित काही लोकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. महिलेने अंधश्रद्धेपायी हे पाऊल उचललं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *