BHUkamp-678x381

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

देश

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास उत्तर भारताला भूकंपाचे हादरे बसले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी नोंदवली गेली.
उत्तर काश्मीरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
भारतात याआधीच अनेक राज्यांमध्ये 2 दिवसांपासून वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात यामुळे मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *