images

धक्कादायक घटना ! मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्याने दलित तरुणीला जिवंत जाळले

देश

मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन दलित तरुणीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला तिच्यात घरात जिवंत जाळण्यात आले. उत्तर प्रदेशातील आजमगडमध्ये ही घटना घडली आहे.
फरिहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी मोहम्मद त्याच गावातील रहिवासी आहे. मंगळवारी पीडित तरुणीच्या घरी जाऊन त्याने मोबाइल नंबर देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. पण तरुणीने नंबर देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर संतापलेल्या आरोपीने तरुणीला मारहाण केली आणि अंगावर केरोसीन शिंपडून जाळून टाकलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तरुणीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि आग विझवली. यावेळी आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केले.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीला जवळच्याच सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यानंतर तिला वाराणसीच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *