bipin-gandhi

बिपीन गांधी यांना नाशिकच्या रेल्वेस्थानकावर हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्र

रेल्वेतील प्रवाशांसाठी लढणाऱ्या बिपीन गांधी यांचा रेल्वेस्थानकावरच मृत्यू झाला. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर बिपीन गांधी यांना हृदयविकाराचा झटका बसला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
बिपीन गांधी हे रेल परिषदेचे अध्यक्ष होते. पंचवटी एक्स्प्रेस आणि नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोई-सुविधांसाठी बिपीन गांधी झटत होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रवाशांसाठी लढत राहिले.
अत्याधुनिक सुविधांसह पंचवटी एक्स्प्रेस पहिल्यांदा नाशिक रोड रेल्वेस्थानकावर येणार होती आणि दुर्दैवी म्हणजे त्याआधीच बिपीन गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नाशिक जिल्ह्याची जीवनवाहीनी समजल्या जाणाऱ्या मनमाड -छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस आजपासून अत्याधुनिक रुपात प्रवाशी चाकरमान्यांच्या सेवेत रुजू झाली आहे. एअर टँक, एअर डिस्क ब्रेक तंत्रज्ञान वापरून या पंचवटीचे नवीन कोच डिजाईन आले आहे. आजपासून नाशिक मनमाड नवीन एक्स्प्रेचा आनंद मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *