bharat(5) (1)

भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात

मनोरंजन

चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेले भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. भारत गणेशपुरे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने सातच्या आत घरात, आई थप्पथ, एक डाव धोबी पछाड यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. फू बाई फू या कार्यक्रमात प्रेक्षकांना त्याच्यातील विनोदवीर दिसून आला. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने तर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. भारत गणेशपुरेच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. भारत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
भारत गणेशपुरेने त्याच्या पत्नीसमवेत पुन्हा लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची टीम काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टूरवर गेली होती. त्यावेळी भारतला सौम्य अटॅक आला होता. भारतचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे त्याने भारतात आल्यावर लगेचच ज्योतिषींची भेट घेतली होती. त्यावर ज्योतिषींनीच त्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच  हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा पत्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
भारत गणेशपुरे यांचं १८ वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे आणि एक मुलगासुद्धा आहे. गोरेगाव इथल्या त्यांच्या राहत्या घरीच हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडणार आहे. भारत गणेशपुरे यांची हळद कालचं पार पडली..श्रेया बुगडेने त्यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *