water

ठाण्यात राहणार दोन दिवस पाणीपुरवठा बंद

मुंबई

स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ९ ते गुरुवार दिनांक १० मे रोजी सकाळी ९ पर्यंत बंद रहाणार आहे. पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि पावसाळ्यापूर्वी पंपिंग स्टेशन आणि सबस्टेशनची दुरुस्ती करण्यासाठी हा पाणीपुरवठा होणार नाही.
यादरम्यान ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ येथील पाणीपुरवठा बंद राहील.
तसेच बुधवारी रात्री नऊ ते गुरुवार सकाळी नऊपर्यंत समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *