TH08BRIEFLY1AGNS2Q3KDI3jpgjpg

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील एका प्रभावी राजकारण्याच्या मुलीला विवाहबंधनातून तसंच पालकांच्या तावडीतून मुक्त करत आपलं आयुष्य मुक्तपणे जगण्याची संधी दिली आहे. २६ वर्षीय तरुणीचं मनाविरोधात लग्न लावून देण्यात आलं होतं, ज्यामुळे तिने घरातून पळ काढला होता. तरुणीला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचं असतानाही जबरदस्तीने दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात आलं होतं. यानंतर २० दिवस तिचा छळ करण्यात आला होता. अखेर पळ काढत तिने आपली सुटका करुन घेतली होती.
तरुणीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर काही तासातच तिला दिल्ली महिला आयोगाच्या हवाली करत काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला. याशिवाय दिल्ली पोलिसांना संरक्षण देण्याचा आदेशही देण्यात आला.
तरुणीने न्यायालयात वकिल इंदिरा जयसिंग यांच्या माध्यमातून आपल्याला बंगळुरुला परत जाऊन शिक्षण पुर्ण करायचं असल्याचं सांगितलं तेव्हा मुख्य न्यायाधीस दिपक मिश्रा, खानविलकर आणि चंद्रचूड यांच्या खंडपीठाने, तुम्ही सज्ञान असून, हवं तिथे जाऊ शकता आणि हवं ते करु शकता असं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *