resizemode-4MT-image

श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचं आगमन

मनोरंजन

बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा फडकवणारा अभिनेता श्रेयस तळपदेला गुड न्यूज मिळाली आहे. श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस बाबा झाला.
श्रेयस आणि दीप्ती यांच्या मुलीचा जन्म ४ मे रोजी झाला. सरोगसीच्या माध्यमातून तळपदे दाम्पत्याला पालकत्व मिळालं.खरंतर १० -१२ दरम्यान बाळाचे आगमन होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही हाँगकाँगला फिरायला गेलो मात्र ४ मे ला सरोगसी करणाऱ्या त्या महिलेला कळा सुरु झाल्याचे समजले आणि आम्ही मागे फिरलो. एअरपोर्टवर आल्याक्षणी आम्हाला मुलगी झाल्याची बातमी समजली. १४ वर्षांपूर्वी श्रेयस आणि दीप्ती विवाहबंधनात अडकले होते.
श्रेयसने आभाळमाया मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्याची भूमिका असलेल्या दामिनी, अवंतिका सारख्या मालिका, तर पछाडलेला, सावरखेड एक गाव, आईशप्पथ यासारखे अनेक मराठी चित्रपट गाजले आहेत.
नागेश कुकूनूरच्या इक्बाल चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर डोर, अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम, गोलमाल सीरिजमधील सिनेमात तो झळकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *