screen-shot-2015-12-03-at-22820-pmpng

‘तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड त्वरित बदला’,ट्विटरकडून आवाहन

व्यापार

ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.अर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने यूजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं आहे.
मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर तुम्ही ट्विटर अकाऊंट वापरत असाल तर तिथला तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा असे ट्विटरने म्हटले आहे. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतो आहोत असेही ट्विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सध्याच्या घडीला ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचे जगभरात ३३० दशलक्ष युजर्स आहेत. या सगळ्यांनाच पासवर्ड बदलण्याचे आवाहन ट्विटरने केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *