suicide-600-1518436071-1519041121

लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र

लग्नानंतर जीवन बदलते असं म्हणतात. मात्र हेच लग्न एका युवकासाठी घातकं ठरलं. लग्न ठरत नसल्याने नैराश्य आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन शेंडगे असं या तरुणाचं नाव आहे. साताऱा जिल्ह्यातील बदेवाडी गावात ही घटना घडली. आपल्या मित्रांची लग्ने झाली मात्र आपले होत नाही यामुळे नितीनला नैराश्य आले होते. आत्महत्येच्या आदल्याच दिवशी रात्री त्यांच्या घरात याबाबत चर्चा झाली. मात्र काही वेळाने त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. नितीनने हे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसलाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *