images_1522057405597_Bucket_List

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आपल्या पहिल्यावहिल्या ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘धर्मा प्रॉडक्शन’ म्हणजेच करण जोहर हे हिंदीतील नाव ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीशी जोडले गेले आहे. त्याचबरोबर माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटाद्वारे बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’बकेट लिस्ट’मध्ये माधुरीने चाळिशीतील गृहिणीची भूमिका केली आहे. सई नावाच्या वीस वर्षीय तरुणीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीचा माहोल असतानाच हा चित्रपट २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्यामुळे या ‘बकेट लिस्ट’ची बरीच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *