670320-mumbai-indians-afp

IPL 2018 मुंबई इंडियन्सला आज विजयाचीच गरज

क्रीडा

आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सला केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे, त्यामुळे उरलेल्या सर्व 6 सामन्यांमध्ये विजय मिळविणे मुंबईसाठी अपरिहार्य आहे. मुंबईचा सामना आज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रंगणार आहे. पंजाबने मालिकेत आतापर्यंत सात सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला असून दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी मालिकेत आतापर्यंत रविचंद्रन अश्‍विनच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली असून त्यांची बाद फेरीकडे वाटचाल सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *