630589-chhagan-bhujbal

अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर

राजकीय

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. भुजबळांना २ वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे, छगन भुजबळ यांचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून – २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता.छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता, छगन भुजबळ यांची प्रकृती तुरूंगात सतत ढासळत असल्याची तक्रार देखील होत होती. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. छगन भुजबळ हे आज जेलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर येऊ शकतील.
महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *