599213-best-buses-080717

‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट

मुंबई

जादा भाडेवाढ, फेऱ्यांची कमी झालेली संख्या, तिकीट मशीनमधील बिघाड अशा वेगवेगळ्या कारणांनी बेस्ट उपक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे.
व्यवस्थापनातील त्रूटीमुळे बेस्टचा प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला-उबरकडे वळत असल्याने प्रवासी संख्या घसरत चालली आहे. बेस्टची प्रवासी संख्या गेल्या ७ वर्षांत ४० टक्क्यांनी घटली आहे.सध्या नऊ हजार ईटीआयएम मशीन असून ६० टक्क्यांहून अधिक मशीन बंद आहेत. त्यामुळे बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड असल्यास हे प्रवासी फक्त स्मार्ट कार्ड दाखवतात आणि बंद मशीनमुळे त्यांची नोंद केली जात नाही. वाहकाकडून फक्त हे कार्ड पाहून त्यांना प्रवासास मुभा दिली जाते. याचा गैरफायदा प्रवासी घेतात आणि कार्डची मुदत किंवा त्याचे रिचार्ज संपलेले असतानाही प्रवासी हे कार्ड घेऊनच प्रवास करतात. अशामुळे दररोज २७ ते २८ लाख प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्याच्या घडीला २५ लाख असल्याची नोंद झाली आहे. तर जवळपास दररोजच्या उत्पन्नावरही परिणाम होत असून ५० लाख रुपये उत्पन्न कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *