DcPUO0bWkAA5q10

धक्कादायक व्हिडीओ: ट्रेनमध्ये शौचालयातील पाण्याने चहा

देश

रेल्वेतील चहा-कॉफीत चक्क रेल्वेच्या शौचालयातील पाणी वापरलं जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ एका प्रवाशानं अपलोड केला आहे. त्यामुळे रेल्वेत बनणाऱ्या या घाणेरड्या चहा-कॉफीच्या व्हिडीओनं झोपा काढणाऱ्या रेल्वे प्रशासनाला जागं केलं आहे.
चहा-कॉफी हे असे पदार्थ आहेत ज्याच्या शिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. रेल्वे प्रवासात बाहेरचे पदार्थ खाऊन त्रास नको म्हणून काही जण चहा-कॉफीवरच भूक भागवतात. या चहा-कॉफीसाठी पाणी कुठून आणलं जातं याचा विचार आपण कधी करत नाही. पण चेन्नई-हैदरबाद चारमिनार एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका जागरुक प्रवाशानं चहा-कॉफी न पिताच झोप उडवून टाकणारा व्हिडीओ टाकला आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील असून सिकंदराबाद-काझीपेठ रेल्वे स्टेशनदरम्यानचा आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसतं आहे की, रेल्वेतील चहा-कॉफी विक्रेते चहा-कॉफीत पाणी मिसळत असून ते पाणी शौचालयातून किटलीत भरले जात आहे.
अखेर या गंभीर प्रकाराची प्रशासनानं चौकशी केली आणि कंत्राटदाराला १ लाख रुपयांचा दंड बजावला, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *