286726-rajasthan

राजस्थान, उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळाचा मोठा फटका

देश

उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील लोकं उष्णतेमुळे त्रस्त आहे तर बुधवारी रात्री आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे या राज्यांमध्ये जवळपास 79 लोकांची मृत्यू झाली असून जखमी लोकांचा आकडा 100 हून अधिक पोहचला आहे.
उत्तर प्रदेशात बुधवारी रात्री वादळामुळे किमान 50 लोकांची मृत्यू झाली आणि 38 जण जखमी झाले. प्रदेशाचे राहत आयुक्त संजय कुमार यांच्याप्रमाणे आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू झाली. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 150 हून अधिक जनावरांची मृत्यू झाली आहे. भयावह तुफानामुळे अनेक घर पडली व विजेचे खांबदेखील उध्वस्त झाले.
तर दुसरीकडे राजस्थानमध्येही 22 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक जखमी झाले आहेत. राजस्थानच्या बीकानेर, भरतपूर, अलवर आणि धौलपूरमध्ये वादळाने सर्वाधिक नुकसान झालं आहे. वादळाचा वेग सुमारे 135 किमी प्रतितास होता. यामुळे जिल्ह्यात शेकडो झाडं आणि विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. चुरु, पिलानी, दौसा और झुंझनू इथे गारपीट झालं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासात राजस्थानात हलक्या स्वरुपाचा पाऊस आणि धुळीचं वादळ येऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *