indian-team

वन डे क्रमवारीत टीम इंडियाची घसरण, इंग्लड क्रमवारीत अव्वल

क्रीडा

आज आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारताला (१२२) मागे टाकत इंग्लडने (१२५)अव्वल स्थान पटकावले आहे. २०१३ नंतर प्रथमच इंग्लड आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आले आहे.
आयसीसीच्या सुधारित वन डे क्रमवारीत टीम इंडियाला आपलं अव्वल स्थान गमावावं लागंल आहे. मागील अनेक दिवसांपासून वन डेमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडने अव्वल स्थानी झेप घेतली असल्याने भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकवर समाधान मानावं लागणार आहे.
इंग्लंडने शानदार कामगिरी करत मागील सहाही मालिकेत विजय संपादन केला आहे. एवढंच नव्हे तर मॉर्गनच्या नेतृत्त्वात खेळताना इंग्लंडने १० पैकी ९ सामन्यात विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *