bdab79bc5a3edabc0656758e128461f1

आता मोबाईल सिम खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही : केंद्र सरकार

देश

तुम्हाला मोबाइलचे नवे सिम कार्ड घ्यायचे असेल तर आधार कार्ड बंधनकारक होते. मात्र केंद्र सरकारने हा नियम शिथील केला असून आता मोबाइलचे सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मोबाइल ऑपरेटर कंपन्या ग्राहकांकडून ओळख पत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदान ओळख पत्र यांचाही स्वीकार करू शकतात असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
फक्त आधार कार्ड नाही, या कारणामुळे ग्राहकाला सिम कार्ड देण्यास मनाई करता येणार नाही. केवायसी फॉर्म भरताना ओळखपत्र म्हणून इतरही पर्याय स्वीकारण्यास हरकत नसल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. सिम आधारशी लिंक करण्याचे आदेश कधी दिले नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं.
टेलिकॉम सचिव अरूण सुंदराजन यांनी सांगितले आहे की मोबाइल कंपन्यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या नव्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आल्याचेही सुंदराजन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *