download

संतापजनक ! ४ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं

महाराष्ट्र

२०० रुपये मागितल्याच्या कारणावरून झालेल्या झटापटीत अवघ्या चार महिन्याच्या बाळाला पतीने जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती दत्ता अनिल देशमुख याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी दत्ता देशमुख (वय २८, रा. बौद्धनगर) असे फिर्याद दाखल करणा-या महिलेचे नाव आहे. दत्ता अनिल देशमुख (वय ३४)असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी महिलेने बाळाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *