bombay-high-court759-1

मुंबई उच्चन्यालायाने केला कोल्हापूरच्या एका जोडप्याचा विवाहच रद्द

मुंबई

मुंबई उच्च न्यायालयानेन एका जोडप्याचे विवाह रद्द केले कारण त्यांच्यात नऊ वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते. तसं तर महिला धोक्याने लग्न केल्यामुळे विवाह रद्द करू इच्छित होती.
हे प्रकरण २००९ मधील आहे. त्यावेळी महिलेचं वय २१ तर तिच्या पतीचं वय २४ वर्ष होतं. महिलेच्या आरोपानुसार, पतीने फसवणूक करुन कोऱ्या कागदावर तिची स्वाक्षरी घेतली. यानंतर महिलेला रजिस्ट्रारकडे नेण्यात आलं. तरीही तिला समजलं नाही की, ती लग्नाची कागदपत्रं होती. पण जेव्हा तिला संपूर्ण प्रकरण कळलं तेव्हा याचिका दाखल करुन लग्न रद्द करण्याची मागणी तिने केली.
शरीरसंबंध नसल्याने लग्न रद्द!
न्यायमूर्ती मृदुला भटकर म्हणाल्या की, “आम्हाला फसवणुकीचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. पण दोघाचं लग्न रद्द केलं जात आहे कारण, त्यांच्यात कधीही शरीरसंबंध झाले नाहीत.” “विवाहबंधनात अडकलेल्या दोन व्यक्तींमध्ये नियमितपणे शारीरिक संबंध होणंही गरजेचं असतं. जर त्यांच्यात शरीरसंबंधच नाहीत तर अशा लग्नाचा काहीच अर्थ नाही. त्यामुळेच हे लग्न रद्द ठरवण्यात आलं,” असं निकाल देताना न्यायमूर्ती भटकर म्हणाल्या.
या प्रकरणात पती-पत्नी लग्न झाल्याच्या दिवसापासून एकदिवसही एकत्र राहिले नाहीत. पतीने लैंगिक संबंध असल्याचा दावा केला पण त्याला एकही पुरावा सादर करता आला नाही. पुराव्याअभावी विवाहाची पूर्तता होत नसल्याचा महिलेचा दावा योग्य ठरतो असा निकाल कोर्टाने दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *