a87d16bfcc56392c5972b5c37f44d010

भारतात ठिकठिकाणी आगीचा भडका,नासाकडून प्रसिद्ध करण्यात आले फोटो

देश

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं गेल्या १० दिवसांतील अवकाशातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्या फोटोंमध्ये भारतातल्या अनेक भागात आग लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह दक्षिणेकडच्या अनेक राज्यांमध्ये अशी आग लागल्याचं दिसत आहे. उन्हाळ्याचा दिवसांत वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असून, कार्बनही उत्सर्जित होतोय.
विविध भागांत लागलेल्या आगींमुळे वातावरणात ब्लॅक कार्बनचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. तसेच याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगवरही झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा लाल ठिपक्यांचा भाग जंगलाचा असल्याचे म्हटले जात असतानाच ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. वैज्ञानिकांच्या मते, आगीचे लोण दिसत असलेल्या सर्वाधिक भागात शेतजमीन असल्याचे सांगितले आहे. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळवणं अतिशय अवघड गोष्ट असते. तसेच, या आगीमुळे वातावरणात सर्वत्र धुराचे लोळ पसरतात. मात्र असे काहीच झालेले दिसत नसल्याने ही आग शेतात लागली असल्याचे नासाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *