suicide

धक्कादायक ! विद्यार्थ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र

अभियांत्रिकीचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोल्हापुरात घडली असून राहुल पारेकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल हा कोल्हापुरातील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. तो मुळचा करमाळ्याचा (जि. सोलापूर) असून कोल्हापुरात शिकायला होता.
शुक्रवारी त्याचा पेपर झाला. पण तो पेपर अवघड गेल्याने तो निराश होता. त्याने पेपर अवघड गेल्याचे आपल्या मित्रांनाही सांगितले होते. शुक्रवारी रात्री घराबाहेर पडलेल्या राहुलचा मृतदेह शनिवारी सकाळच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळील रेल्वे मार्गावर आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने पेपर अवघड गेल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. या घटनेबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *