286088-bhandup

मुंबईत स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई

भांडुपच्या टँक रोड परिसरात असणाऱ्या साईसदन चाळीत सार्वजनिक शौचालय खचल्याची घटना घडली आहे. या शौचालयाचा संपूर्ण ढाचा जमीनदोस्त झाला असून यामध्ये प्रातविधीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
साईसदन चाळीत असणारे सार्वजनिक शौचालय सकाळी सहाच्या सुमारास अचानक खचले. ज्या ठिकाणी ही शौचालयं होते तिथे मोठा खड्डा पडला आहे. दरम्यान, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत चार जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *