Reliance-jio

रिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात ७५ ते ८० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या १ लाख ५७ हजार ऐवढी आहे. यामध्ये लवकरच ७५ ते ८० हजार कर्मचाऱ्यांची भर पडेल, अशी माहिती कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख संजय जोग यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली.
संजय जोग यांना रिलायन्स जिओकडून सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. जोग यांनी या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले. देशभरातील सहा हजार महाविद्यालयांशी कंपनीने करार केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *