1f56394accbc79a636f81fa81f776719

रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून निवड झाली आहे.राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी डॉ.सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक केली. राज्यपालांनी आज (२७ एप्रिल) राजभवनात डॉ. सुहास पेडणेकर यांना नियुक्त पत्र सोपवलं.
डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत करण्यात आली आहे.

अशी झाली निवड

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी १३ आणि १४ एप्रिल रोजी ३२ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून डॉ.कस्तुरीरंगन समितीने अंतिम पाच जणांची निवड केली आहे. त्या पाच जणांच्या मुलाखती कुलपतींकडून पूर्ण झाल्या आहेत.
कुलगुरुपदासाठी डॉ. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. प्रमोद येवले, अमरावती विद्यापीठाचे डॉ. विलास सपकाळ यांच्यात मुख्य चुरस होती. त्यामधून आज डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नावाची घोषणा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *