Addhar

भारतातील सर्वात तरुण आधारकार्ड असणारी व्यक्ती ठरली साची

महाराष्ट्र

बुलढाण्यातील खामगावची साची ठरली भारतातील सर्वात तरुण आधारकार्ड असणारी व्यक्ती.जन्माच्या दुसऱ्या मिनिटाला साचीच्या आईवडीलांनी तिचे नाव ‘आधार’साठी नोंदवले. आणि लगेचच ‘बाल आधार’साठी लागणारी सर्व माहिती घेऊन तिला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) १२ आकड्यांचा ‘आधार’ क्रमांकही दिला.
साचीचे आईवडील मुळचे बुलढाण्यातील खामगावचे आहेत. १८ एप्रिल रोजी साचीचा जन्म झाल्यानंतर १ मिनिट ४८व्या सेकंदाला त्यांनी तिचे नाव ‘आधार’कार्डसाठी नोंदवले. मुलीच्या जन्माच्या आनंदाबरोबर आपली मुलगी ‘बाल आधार’कार्ड असणारी सर्वात तरुण भारतीय ठरल्याचा विशेष आनंद असल्याचे साचीच्या वडिलांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले.
‘मेरा आधार मेरी पेहचान’ असे ‘आधार’चे स्लोगन असल्याने माझ्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये तिचे नाव मी ‘आधार’साठी नोंदवले. यासाठी मला मदत करणाऱ्या सर्व मित्रांचे आणि ‘आधारा’च्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देत असल्याचेही साचीचे वडील म्हणाले.

प्रत्येकाने आपले नाव आधार कार्डसाठी नोंदवले पाहिजे अशी अपेक्षा साचीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. ‘आधार’सारख्या सुविधांमुळे सरकारला त्यांच्या योजना आपल्यासारख्या सामान्यांपर्यंत पोहचवणे अधिक सोप्पे जात असल्याने त्याचा नागरिकांना फायदा होतो असे मतही त्यांनी नोंदवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *