285983-456936-yt

युट्युबने केले ५ मिलियन व्हिडिओज डिलीट !

व्यापार

सुमारे ५ मिलियन व्हिडिओज युट्युबने अलिकडेच डिलीट केले आहेत. २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यात हे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हे व्हिडिओज बघण्यापूर्वीच गुगल द्वारे अधिकृत व्हिडिओ शेअरिंग प्लेटफार्मने डिलीट केले. कंपनीने असे केल्याचे कारण म्हणजे अनुचित कंटेंट पोस्ट केल्यामुळे कंपनीला खूप काळापर्यंत टिकेला सामोरे जावे लागले होते.
एका रिपोर्टमधून युट्युबने सांगितले की, ८० लाखात ७६% व्हिडिओजला १ व्हिव्यू मिळण्यापूर्वी डिलीट करण्यात आले. यात अनुचित आणि हिंसक कंटेंट असल्याने कंपनीला हे पाऊल उचलावे लागले. सुमारे ९३ लाख व्हिडिओज युट्युबवर असे आहेत जे युट्युब गाईडलाईन्सचे उल्लंघन करत आहेत. यातील अधिकतर व्हिडिओज भारतातील आहेत. या क्रमवारीत अमेरिका दुसऱ्या आणि युके सहाव्या स्थानावर आहे.
युट्युबने सांगितले की, सातत्याने व्हिडिओजची तपासणी केली जात आहे आणि नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओज रिमूव्ह करण्यात येत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *