00aad22dd448ed6f677329e3ef4b16e1

प्रसिद्ध कवयित्री महादेवी वर्मांना गुगलने डुडलद्वारे वाहिली श्रद्धांजली

मनोरंजन

गुगलने डुडलच्या माध्यमातून हिंदीतील महान कवयित्री, स्वातंत्र्य सेनानी आणि महिला अधिकारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणा-या महादेवी वर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महादेवी वर्मा यांना भारतीय साहित्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल २७ एप्रिल १९८२मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला आहे. सोनाली जोहरा हिने या गुगल डुडलला बनवले आहे.
प्रसिद्ध कवयित्रीच्या हातात डायरी आणि पेन असल्याचे या डुडलमध्ये दाखवण्यात आले आहे. मॉर्डन मीरा असेही महादेवी वर्मा यांना संबोधले जाते. २६ मार्च १९०७मध्ये उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये महादेवी वर्मा यांचा जन्म झाला होता. १९१६मध्ये वयाच्या ९व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता. परंतु विवाहानंतर त्यांनी स्वतःच्या आई-वडिलांच्या घरी राहणेच पसंत केले आणि त्यांनी अलाहाबाद क्रॉसवाइट गर्ल्स स्कूलमध्ये स्वतःचे पुढचे शिक्षण पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *