8150b2c47aa5e5c2969ed70034df19cb (1)

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने : पंकजा मुंडे

शिक्षण

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
राज्य सरकारच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षक संघटनांसह याबाबत चर्चा झाली असून १८ संघटनांनी याचे स्वागत केल्याचे मुंडे म्हणाल्या. या वर्षी एक लाखाहून अधिक शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्या १०० टक्के पूर्ण केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नव्या धोरणानुसार बरीच वर्षे घरापासून दूर असलेल्या शिक्षकांना आता आपल्या परिसरात येता येणार आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना सुगम भागात येण्याची संधी उपलब्ध झाली असून या धोरणामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *