maxresdefault

देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली आणि प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी राहुल द्रविडच्या नावाची शिफारस केली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांची ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.तसेच बीसीसीआयने सलामीचा शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस केली आहे असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले. बीसीसीआयने दुसऱ्यांदा खेल रत्न पुरस्कारासाठी कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. याआधी २०१६ मध्ये बीसीसीआयने कोहलीची शिफारस केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *