c0fb6b2deb1f6f60d132b14db08a2c25

महाड एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग

कोकण

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसर गुरुवारी दुपारी स्फोटाच्या आवाजाने हादरला. एमआयडीसीतील प्रिव्ही ऑर्गेनिक कंपनीत दुपारी भीषण आग लागली. कंपनीतून स्फोटाचा आवाज आला असून हा स्फोट नेमका कसला होता आणि आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.
आगीसोबत कंपनीतून स्फोटांचे आवाजही आले आणि संपूर्ण परिसर या आवाजांनी हादरुन गेला. परिसरात सर्वत्र धुराचे लोट असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *