a0ee6c6635e7f5f02c5a4deedc3373d5

पालघर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैंवी मृत्यू

महाराष्ट्र

पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघर जवळील आगवन येथे ही घटना घडली आहे. सुरक्षा माच्छी आणि खुशबू माच्छी अशी मृत मुलींची नावे आहेत. मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर परिसरातही घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा आणि खुशबू आंघोळीसाठी तलावात गेल्या असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढून पालघरमधील ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी दोन्ही मुलींना मृत घोषित केलं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *