images

प्रकल्प ग्रस्थांना सामावून घेण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आश्वासन, शंभर टक्के प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणार – निलेश राणे

कोकण

कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्रालयाच्या कार्यकारी संचालकांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिले आहे. या आश्वासनानंतर निलेश राणे यांनी जोपर्यंत प्रकल्पग्रस्थासह अन्य प्रश्न १०० टक्के सुटत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा करणार अशी आक्रमक भूमिका ठेवली आहे. या भूमिकेला प्रकल्पग्रस्थानी समर्थ दिले असून लवकरच पुढची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

१९९१ मध्ये कोकण रेल्वे मार्गासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ठिकठिकाणी भूसंपादन केले गेले. अनेक वर्षांपासून येथील प्रकल्पग्रस्थाच्या प्रश्नाकडे कोकण रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. याबाबत काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्थानी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्थावर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. अखेर निलेश राणे यांनी स्थानिक पातळीवर प्रशासनाची चर्चा केली. त्यांनतर प्रकल्पग्रस्थाना सोबत घेऊन दिल्ली येथे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रकल्प ग्रस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी व पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश कार्यकारी संचालकांना दिले. दरम्यान कार्यकारी संचालक ए.पी.द्विवेदी यांनी निलेश राणे यांना पत्राद्वारे कळविले आहे. की आतापर्यंत कोकण रेल्वे मध्ये २८०३ प्रकल्पग्रस्थाना सामावून घेण्यात आले असून त्यातील १४८५ प्रकल्पग्रस्थ रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.पुढील भरतीमध्ये अधिकाधिक प्रकल्पग्रस्थाना सामावून घेतले जाईल असे स्पष्ट केले आहे.
यावर निलेश राणे यांनी आम्ही येथेच थांबणार नसून संपूर्ण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्थाना न्याय मिळत नाही आणि अन्य प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा करणार अशी स्पष्ट भूमिका निलेश राणे यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *