2leopard_27

बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू

मुंबई

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षक स्वस्तिक काटकर यांचा मृत्यू झाला.आज सकाळी उद्यानात गस्त घालत असताना ही घटना घडली.
स्वस्तिक काटकर उद्यानात गस्त घालून झाल्यानंतर तुलसी तलावाजवळ बसले होते. त्याचवेळी मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *