640x366xWorld-Cup-2019.jpg.pagespeed.ic.1t0nlhaWIj

२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर

क्रीडा

अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.आगामी वर्षात इंग्लंडमध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. ESPNCricinfo या संकेतस्थळावर विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. ३० मे २०१९ रोजी यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याने क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी द. आफ्रिके विरुद्ध होणार आहे, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जुनला मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतले सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.

२०१९ विश्वचषकाचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ जून

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून

भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २७ जून

भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *