Film_Companion_Trailer-Talk_Raazi_lead_4

आलिया भट्टच्या राझी चित्रपटातील दिलबरो गाणे रिलीज

मनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या आगामी राझी चित्रपटातील नवे दिलबरो गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.स्टुडंट ऑफ दि इयर’ चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यापासून फार कमी कालावधीत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आहे. आलियाने आतापर्यत अनेक हिट चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता लवकरच तिचा ‘राजी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
गुलजार यांनी या गाण्याचे शब्द लिहिले असून हे प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने गायले आहे. गायिकेचा आवाज हृदयाला स्पर्शून जातो. वडील-मुलीचे सुंदर नाते गाण्यात दाखवले आहे. मुलीच्या पाठवणीचे हे गाणे भावूक करणारे आहे. कश्मिरी बोल गाण्यात वापरण्यात आले असून ही कथा एका साध्यासुध्या काश्मीरी मुलीची आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित राझी या चित्रपटाचे कथानक १९७१च्या पार्श्वभूमीची असून आलिया एका महिला गुप्तहेराची भूमिका पार पाडणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *