EVM-ELECTION-2017

गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे, तर ३१ मे रोजी निकाल जाहीर होईल. त्यासोबतच, पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तर भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त आहे. वनगा यांचं 30 जानेवारी 2018 रोजी निधन झालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पलूस मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. पतंगराव कदम सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करायचे. 9 मार्च 2018 रोजी त्यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *