shardashram

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार ?

मुंबई

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ज्या शाळेने घडवलं, त्या मुंबईतील दादरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर पश्चिममधल्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेला महापालिकेने 1969 मध्ये विनाअनुदानित शाळा म्हणून मान्यता दिली. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या 12 तुकड्यांना कायम अनुदानित तत्त्वावर 1 जून 2015 ते 31 मे 2020 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे.
शारदाश्रम विद्यामंदिर ही शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न असलेली शाळा. शाळा प्रशासनाने पुढील वर्षांपासून मात्र ‘आयसीएसई’ या आंतरराष्ट्रीय मंडळाशी शाळा संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत पाचवीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयसीएसई’ने निश्चित केलेला अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी यंदा चौथीतील विद्यार्थ्यांचा दाखला पालकांनी घ्यावा आणि पुढील वर्षी पाचवीसाठी शाळेत नव्याने प्रवेश घ्यावा, अशी सूचना शाळेने केली आहे.
शारदाश्रम शाळा ही दादरची एक ओळख आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांसारखे क्रिकेटर या शाळेने घडवले आहेत. फक्त क्रिकेटच नाही तर विविध क्षेत्रांमध्ये शाळेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्यामुळे शाळेचं नाव बदलू नये, अशी मागणी करत दादरच्या रहिवाशांनी नामकरणाला विरोध केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *