1d19192df7ca704c192dbf2ca6b97374

बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज जोधपुर विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २०१३ च्या बलात्कार प्रकरणी आसारामसह सर्व आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी आसारामला १० वर्षाची शिक्षा होऊ शकते.

आसाराम गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात आहे. आज न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये २१ एप्रिलपासून १० दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *