suicide

पेपर खराब गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

महाराष्ट्र

बारावीचे पेपर खराब गेल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.वैशाली सुधाकर फुंदे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती यवतमाळच्या अँग्लो हिंदी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेत पेपर खराब गेल्याने ती तणावाखाली होती. नापास झाल्यास घरचे काय म्हणतील या विचारात तिने मंगळवारी रात्री आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला.
हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वैशालीचे वडील सुधाकर फुंदी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *