accident_copy1

धक्कादायक ! एसटी आणि डंपरचा भीषण अपघात

महाराष्ट्र

दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी आणि डंपरचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी आहेत.कराड-सोलापूर महामार्गावर खानापूर तालुक्यातील विटा जवळील रेवनगाव घाटात ही घटना घडली. कराडहून आटपाडीला जाणारी ही बस रेवनगावचा घाट चढत होती, त्यावेळी समोरुन येणारया डंपरने एस टीच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. यानंतर डंपर देखील पलटी झाला.
या अपघातात विजय जालिंदर कुंभार (वय 46),तानाजी विलास जाधव(वय47 रा. भडकेवाडी) आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49 रा.वाटूंबरे ता.सांगोला) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर सत्वशीला श्रीरंग धाने, दत्तू सुनील धाने (रा,धानेवाडी) आणि साई सुनील धाने हे जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *