sachin-tendulkar_df21357c-28a0-11e7-a28f-c563b2540923

वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांंचा वर्षाव

क्रीडा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 45 वा वाढदिवस. क्रिकेटचा देव सचिन आज 46व्या वर्षात पदार्पण करतोय. सचिनचे चाहते विविध स्तरांवर आहेत. वाढदिवसानिमित्त सचिनवर शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर #HappyBirthdaySachin हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे. सर्वत्र सचिनमय वातावरण झाले आहे.
भारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर ज्याने तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवलं त्या देवाचा आज जन्मदिन. क्रिकेट चाहत्यांना अगदी वेडा करुन टाकणारा हा महान फलंदाज भारतात जन्माला आला यासारखं भाग्य नसावं.सचिनने खरंच क्रिकेट रसिकांसह सगळ्यांनाच त्याच्या अफलातून फलंदाजीने वेडे केले. जेव्हा सचिनने प्राणप्रिय क्रिकेटमधून संन्यास घेतला तेव्हा मात्र सर्वांनाच दु:ख झालं.
सचिन आतापर्यंत भारतासाठी 400 हून अधिक एकदिवसीय सामने, 200 कसोटी सामने खेळला. एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा, तर कसोटी सामन्यामध्ये 15 हजार 921 धावा करुन सचिनने क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं.तसेच वन-डे आणि कसोटी सामन्यांत मिळून 100 शतकं, वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम द्विशतक करणारा खेळाडू यासारखे अनेक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
आज संपूर्ण जगभरातून सचिनवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *