285400-586892-petrol

सामान्यांना मोठा झटका,राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले !

महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही भडकले आहेत.सोमवारी पेट्रोलचे दर 83.33 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 71.00 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर प्रतिबॅरल 105 डॉलर होते. आता ते 74 डॉलर आहेत. म्हणजेच चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली दिसते.
इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

राज्यातले आजचे दर

मुंबई – पेट्रोल 82.48 रुपये प्रति लिटर, डिझेल 70.02 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर – पेट्रोल 82.67 रुपये प्रति लिटर, डिझेल 69 रुपये प्रति लिटर

नागपूर – पेट्रोल 80.13 रुपये प्रति लिटर, डिझेल 70.75 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद – पेट्रोल 83.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 71.00 रुपये प्रति लिटर

नाशिक – पेट्रोल 82.99 रुपये प्रति लिटर, डिझेल 69.76 रुपये प्रति लि

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *