accident_copy1

नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू

महाराष्ट्र

नियतीच्या खेळापुढे कोणाचे काय चालणार म्हणा… असेच काहीसे शिवलिग कुनके आणि कोमल यशवंतकर या जोडप्यासोबत घडले.नांदेड- बिलोली मार्गावरील कासराळी येथे वाहनांची समोरासमोर धडक होऊन एका नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. १९ एप्रिल रोजीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांमध्येच या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
शिवलिग कुनके (वय २४) आणि कोमल बालाजी यशवंतकर (वय २०) हे नवविवाहित दाम्पत्य जळकोट येथून नांदेडकडे निघाले होते. मात्र, रस्ता चुकल्यामुळे ते बिलोलीच्या रस्त्याने निघाले. सोमवारी कासराळी येथील पेट्रोल पंपाजवळ टेम्पोने कारला धडक दिली. या धडकेत शिविलग आणि कोमल या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
१९ एप्रिल रोजी लग्न झालेल्या या दाम्पत्याचा संसार अवघ्या तीन दिवसांमध्येच संपल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *