maoist-45

गडचिरोलीत 48 तासात 33 नक्षलवाद्यांचा खात्मा

देश

गेल्या 48 तासात आतापर्यंत 33 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.इंद्रावती नदीत आणखी अकरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत.नदीत आढळलेल्या अकरा नक्षलवाद्यांपैकी सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतरांचे मृतदेह काढण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांवर हल्ला चढवत पहिल्या कारवाईत 16 जणांचा खात्मा केला होता, या हल्ल्यात जखमी अवस्थेत पळून जात असलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह नदीत आढळले.
गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठं ऑपरेशन पार पाडत काल, राजाराम खानाला परिसरात सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पडलं.
पहिल्या ऑपरेशनमध्ये सोळा नक्षलवाद्यांना कंठस्नान
गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत रविवारी पहाटे 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरातील पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *