1-img_5746-copy

महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीवर माशांचे प्रमाण कमी होण्याच्या मार्गावर

कोकण

महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीवर माशांचे प्रमाण कमी होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून माशांनी महाराष्ट्राचा किनारा सोडला आहे. खवय्यांच्या आवडीचे कुपा, रावस, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगड्यासह जवळा आणि करदीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माशांचा भाव चांगलाच वधारला आहे.महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर गोवा, गुजरात, केरळ आणि कर्नाटकातल्या महाकाय बोटी येऊन मासेमारी करत आहेत आणि त्याचा थेट परिणाम माशांच्या प्रजननावर होत आहे. मच्छिमार वापरत असलेल्या पर्सिसन जाळ्यांमुळे मोठ्या माशांसह लहान मासेही अडकून मरतात. त्यामुळे ही जाळीही मासेटंचाईचं कारण समजलं जात आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *