asus-zenfone-max-pro-m1-leaked

असुसचा नवा फोन भारतात लाँच

व्यापार

असुसने आपला पहिलाच फोन जेनफोन मॅक्स प्रो M1 भारतात लाँच केला आहे. 18:9 ऑस्पेक्ट रेशोची फुल एचडी स्क्रीन असणारा हा फोन आहे. भारतासह जगभरात हा फोन लाँच करण्यात आला. फ्लिपकार्टवर 3 मेपासून या फोनची विक्री सुरु होईल.
असुस मॅक्स प्रो M1 ची किंमत भारतात 10 हजार 999 रुपयांपासून सुरु होणार आहे. सोबतच 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनची किंमत 10 हजार 999 रुपये असेल, तर 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनची किंमत 12 हजार 999 रुपये असेल. कंपनीने फ्लिपकार्टसोबत मोबाईल प्रोटेक्शनसाठी भागीदारी केली आहे. त्यामुळे 49 रुपयात या फोनचं डॅमेज रिपेअर करुन दिलं जाईल.
मॅक्स प्रो M1 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आणि सेकंडरी लेन्स 5 मेगापिक्सेलची आहे, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर आणि फ्रंट अशा दोन्ही कॅमेऱ्यांसाठी फ्लॅश आहे. इंटर्नल स्टोरेज 2TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. या फोनची बॅटरी हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 5000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.
मॅक्स प्रो M1 ड्युअल सिम सपोर्टिव्ह आहे, जो अँड्रॉईड 8.1 ओएस सिस्टमवर चालतो. अँड्रॉईड P आणि Q चे अपडेट या फोनला मिळतील.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *