crime cuffs

पुण्यातील शिक्षकाचा प्रताप,वंशाला दिवा हवा म्हणून केले हे कृत्य

महाराष्ट्र

वंशाला दिवा हवा, म्हणून पिंपरी चिंचवडजवळ सांगवी परिसरातल्या एका 45 वर्षाच्या शिक्षकाने एका 19 वर्षाच्या मुलीशी विवाह केला. मात्र या मुलीने धाडसाने नवऱ्याच्या तावडीतून पळ काढला, आणि या शिक्षकासह स्वतःच्या पालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाला सांगवी पोलिसांनी सोमवारी अटक केली. मार्च महिन्यात एका 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याच्या आरोपात या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकाचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक 14 वर्षीय मुलगी आहे. पण मुलगा हवा या इच्छेपोटी शिक्षकाने एका 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करुन त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. अपहरण झालेल्या मुलीचे आई-वडील आरोपी शिक्षिकेच्या कृत्यात सहभागी होते.आई वडिलांवर 6 ते 7 लाख रुपयांचे कर्ज होतं, ते फेडण्याचं आश्वासन या भामट्या शिक्षकाने दिलं होते.
सांगवी पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तसंच आरोपी शिक्षकाच्या पत्नीला अटक केली आहे. पीडित तरुणीचं अपहरण करून तिला सुरूवातीला येरमाळा येथे ठेवण्यात आलं होतं. तेथून स्वतःला वाचविण्यासाठी तरुणीने घडलेला सर्व प्रकार मोबाइलवर रेकॉर्ड करुन त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली व स्थानिक पोलिसांना पाठविली. पोलिसांनी या व्हिडीओ क्लिपद्वारे तरुणीला वाचविलं. पोलिसांच्या मदतीनंतर ती तरुणी आई-वडिलांच्या घरी गेली. पण तिथे आई-वडिलांनी तिला मदत न करता पुन्हा शिक्षकाच्या घरी जायला सांगितलं. अखेरीस 20 एप्रिल रोजी या तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी शिक्षक व इतर 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षकाच्या कुटुंबीयांना मुलगा हवा होता.त्यासाठी त्याने दुसरं लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *