0e24a57b99a149efe0c41ef73723f4cbaa91ec76

मोटो G5s स्मार्टफोनच्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात

व्यापार

मोटोरोलाने आपल्या मोटो G5sच्या किंमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना उपलब्ध आहे.गेल्या वर्षी मोटो G5s 13,999 रुपयांना लाँच केला होता. त्यामुळे आता या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 4,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Moto G5s चे फीचर :
या स्मार्टफोनच खासियत म्हणजे याचा ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप. Moto G5s मध्ये 5.2 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याचं रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएसवर आधारित आहे.
या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *