284441-225676-kalank

करण जोहरचा स्टारकास्ट असलेल्या आगामी ‘कलंक’ या सिनेमाची घोषणा

मनोरंजन

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने मोठी स्टारकास्ट असलेल्या आगामी ‘कलंक’ या सिनेमाची घोषणा केली आहे. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा १९ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.या सिनेमातून अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी तब्बल २१ वर्षांनी पुन्हा पाहायला मिळणार आहे.
आलियाने ट्विटर हँडलवरुन या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केले. आलिया आणि वरुणच्या या सिनेमाचे नाव कलंक आहे. या सिनेमात आलिया, वरुण आणि माधुरीशिवाय संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचे नाव कलंक असून हा सिनेमा ७०-८०च्या दशकातील सिनेमाची आठवण करुन देतो. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन करणार आहेत. याआधी आलिया आणि अर्जुन कपूर यांच्या २ स्टेटस या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले.
वरुण आणि आलियाचा हा एकत्र चौथा सिनेमा आहे. दोघांनी स्टुडंट ऑफ दी इयर, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्रीनाथ की दुल्हनिया सारख्या सिनेमात एकत्र काम केले होते. कलंक या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे खूप वर्षानंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्तची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. हे दोघेही सज्जन, खलनायक आणि थानेदारसारख्या सिनेमात एकत्र दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *